Thursday, January 21, 2010

शी विषयी...

"शी" म्हणजे सगळ्यांनी अगदीच "नाकं" (शब्दशः) नाकं मुरडण्याचा विषय.
पण यावर पुष्कळच लिहिण्यासारखं आहे. खरंतर बोलण्यासारखं! आणि तेच मी करणार आहे.
तर हा प्रारंभिक लेख आहे. त्यामुळे शीचे तपशीलवार लेखन पुढे होत राहील पण या विषयाच्या कक्षा आपण ठरवून घेऊ म्हणजे "काय शी करून ठेवलीये!" असं म्हणायला ज़ागा राहणार नाही. या विषयाला एकाएकी "शी-अध्ययन" (She Studies) वगैरे असं नाव आपण देणार नाही. केवळ नोंदवून ठेवू कारण याला अजून एक ज्ञानशाखा म्हणावं अशी सैद्धांतिक, वर्णनात्मक बैठक मिळालेली नाही पण भविष्यात मिळाली तर हे नाव स्पर्धेत राहील. शिवाय "सरशू" (Michel de Certeau) या फ़्रेंच विचारवंताने जसे Practices of Space या लेखाने एक वेगळेच संशोधनक्षेत्र पुढे आणले तसे यातून पुढे येवो!

असो ज़रा औपचारिक सूर ज़ावा म्हणून मी वैयक्तिक गोष्टींनी सुरुवात करतो. शी माझ्यासाठी लहानपणासूनच एक मनोवेधक (interesting) विषय होती. एकतर ती इतरांना ज़शी सोयीच्या वेळी येते तशी ती मला कधी योग्य वेळी भरभरून आलीच नाही. यायची ती अगदी कुठे ज़ायची तयारी पूर्ण झाल्यावर. शाळेत ज़ाताना गणवेश चढवून उत्तम भांग-बिंग पाडून पावडर चोपडून तयार झालं रे झालं की ती यायची. त्यामुळे आवरण्यातला सगळा टवटवीतपणा कमी होतो असं मला वाटे. पण शी होणं फार महत्त्वाचंच! बर्‍याचदा दारावर आलेली रिक्षा, शाळेला होणारा उशीर हे बघता मी शी टाळत म्हणजे दाबतही, पण बर्‍याच अनुभवांती मी शिकलो होतो की शी कधीही दाबू नये. एकदा मी मोठ्या प्रमाणात आलेली शी दाबून शाळेला गेलो होतो. तेव्हा माझा शी दाबून संध्याकाळी नंतर करण्यावर बराच विश्वास होता कारण ते तंत्रच मला साधलं होतं असं मला वाटू लागलं होतं. त्याचा एक तोटा होता की नंतर ती शी बर्‍याच उशिरा येई आणि शीचे स्वरूप (घट्ट इ.) रंगही (पिवळा ते काळा यातल्या छटा) बदलेला असे. पण यासमोर योग्य वेळी न आलेली शी दाबणं काही फार क्लेशकारक नव्हतं. एकदा मी शी दाबून शाळेला गेलो होतो. तेव्हा प्रार्थना, राष्ट्रगीत चालू असतांना येणार्‍या शीच्या कळा दाबण्यात सर्व ऊर्जाच ज़णू खर्च होऊन मी बेशुद्ध होतो की काय असं वाटलं. शिवाय शाळेत शी करणं मला पसंत नव्हतं एकतर फारच साधारण स्वच्छतेचा दर्जा आणि नंतर हात धुण्याची फारच टुकार सोय. म्हणजे डेटॉल लिक्वीडच पाहिजे असा हट्ट नव्हता पण रिन पावडर किंवा कपडे धुण्याच्या साबणाने हात धुणे मला मंज़ूर नव्हते. ते अगदी अल्पशा उरलेल्या कपड्याच्या निळ्या साबणाला हात लावण्याचेही धाडस होत नसे. शिवाय शाळेच्या संडासात भयानक दिसणार्‍या कोळ्यांची इतिहासपूर्वकालीन ज़ाळी होती. ते कोळीसुद्धा लाख-एक वर्षांचे असतील अशा आत्मविश्वासाने तिथे स्थायिक झालेले होते. यामुळे शाळेत शी करण्याचा पर्याय बंद होता. दाबणेही काय करू शकते ते मी अनुभवले होते. त्यामुळे घरूनच करून निघणे हाच एकमेव मार्ग होता.

दुसरे म्हणजे मला एरव्ही बाहेर गावी गेल्यावरही शी सहजासहजी होत नसे. आपले रोजचे झोपेचे ठिकाण सोडून जसे एखाद्याला इतरत्र झोप मुश्किलीने येते तसेच माझे शी चे होते. बाहेरगावच्या ठिकाणचे शौचालय कमालीचे स्वच्छ आणि हवेशीर असेल तर मला काही अडचण नव्हती, पण असे अपवादानेच व्हायचे.

एखाद्या घराच्या [(आणि गृहिणीच्या) असे म्हणण्यात कुठेही असे गृहीत धरलेले नाही की स्त्रियांनीच ही कामे करायची असतात. गृहिणी हा शब्द येथे generic अर्थाने वापरला आहे। ही कामे करणार्‍या घरातील कोणालाही तो लागू पडावा. ज़सा इंग्रजीत Man किंवा मराठीत माणूस, स्त्री व पुरुष दोघांचाही अंतर्भाव करतो तसा गृहिणी केवळ स्त्रीवाचक समज़ू नये!] स्वच्छतेचा दर्जा त्यातील संडासाच्या स्वच्छतेवरून स्पष्ट कळून येतो हे लक्षात ठेवावे. बाकी सारे निकष एकीकडे आणि मोरीच्या स्वच्छतेचा एकीकडे. इतक्या खात्रीपूर्वक अन्य कशावरूनही सांगता येत नाही.

बर्‍याचदा शीच्या अशा वागण्याने मी बाहेर पडण्यापूर्वी एक हजेरी लावून यायचो. झाली तर सोन्याहून पिवळे (की पिवळी!) नाहीतर आपण आपल्याकडून एक प्रयत्न केला होता असे समाधान. संस्कृतात सुभाषित आहे " यत्ने कृते यदि न सिध्यति कोsत्र दोषः" म्हणजेच प्रयत्न करुनही यश आले नाही तर यात काय दोष! शिवाय मराठीतही म्हण आहेच की केल्याने होत आहे रे आधी केलेची (की केलीची) पाहिजे!

12 comments:

  1. balpan....chinu..shabdik kotya...!!!!!!!!Sahitik lekhanat hey kilaswanya lekhala jaga nahi...bilkulach thara nahi!!!
    Matra vishayachi nivad akalpaniye..parat ekada Chinuche vegalepan siddha karnari ahe. Bahuda he chinuch karu jane!!!!!

    Mithila

    ReplyDelete
  2. hahahahahha :)))) kelyane hot aahe re..aadhi kelichi pahije ..mast watala..

    ReplyDelete
  3. लेख शी झालाय. व्वा हा शब्द या विषयाच्या प्रकृतीला मानवणारा नाही म्हणुन लिहीला नाही.याबाबत स्वर्गीचे देव काय करतात हा मला नेहमी सतावणारा प्रश्न आहे. आता ते देव म्हणुन ह्या सगळ्याची त्यांना काय गरज असे असेल, तर मी म्हणेन त्यांच्या नशीवी हे सुख कुठल?
    खरंतर शी करण्याइतका माझ्या आवडीचा आणखि एक विषय आहे.
    पण पुन्हा लोकं नाकं मुरडतील...

    ReplyDelete
  4. भले!!!
    व्वा चिनू. सुरवात तर लय भारी झाली. ह्या विषयासंबंधी आणि आणखीही अशा अ-वाच्य मानण्यात येणाऱ्या विषयांवर लेखन होणं आवश्यक आहे. ह्या विषयांवर एक तर लोक बोलत नाहीत आणि बोललेच तर त्यात काही तरी विकृत आनंद आहे अशा पद्धतीने बोलतात (खरं तर असं होण्याचं कारण काय असावं हाच एक शोध घेण्यासारखा विषय आहे.). लेखनात तर असे विषय येणं म्हणजे अधःपातच. पण हेही विषय अभ्यासाला उपलब्ध आहेत हे कळलं पाहिजे.

    ReplyDelete
  5. चिन्या,

    एकुणात... "शी" चांगली झालीय...अगदी "आह्ह्ह'' वाटावं असा लेख...

    पण मला वाटलं की ''शी'' चा शाब्दिक उगम वगैरे असेल पण तसं काही नाहीय... ( पण "शी बुवा!!" असं म्हणता येणार नाही...स्कोप च नाही लेख 'शै'[तद्धित]ली छान !!)
    मनोरंजन झालं... सार्वत्रिक अनुभवाचे प्रकटीकरण...

    ReplyDelete
  6. wwwaaa.........

    'she' asaavi tar 'ashi'!!!

    ReplyDelete
  7. lai bhari!

    mi kuThe 'shi' viShayi bollo, ki lok naak muraDtat. ka?? we must talk about it!

    abhinandan!

    ReplyDelete
  8. मराठी आज्ञाधारकपणा---
    मराठी लोकात आज्ञाधारकपणा कमी असतो म्हणून की काय मराठीत आज्ञाधारकपणाची शिकवण देणारे खूप किस्से आहेत. त्यापैकीच एक असा: एक मराठी तरुण असतो. त्याला नौकरी नसते.बर्‍याच खटपटीनंतर त्याला एका सावकाराकडे नोकरी मिळते. जॉब-डिस्क्रप्शन असे: सावकार सकाळी शेतात हगायला जाई. बरोबर एक नोकर छत्री धरून ठेवी. आता हा दुसरा नोकर होता. सावकाराने " हां , धू !"
    म्हटले की ह्याने मागून नीट पाणी ओतून शी धुवायची. आता नोकर होता नवीन तरूण. धुता धुता त्याचे कुतुहूल जागे झाले. त्याने विचारले "सावकार, हे काय लटकते आहे ?". लगेच त्याची नोकरी गेली. त्यावर असा सल्ला देण्यात आला की मराठी तरुणांनी नोकरी करताना ध्यानात ठेवावे की मालक म्हणाला की धू ! तर आपण पाणी ओतायचे ! उगाच चौकशा करायच्या नाहीत की हे काय लटकते आहे? वगैरे.
    ----अरूण भालेराव
    मराठी

    ReplyDelete
  9. सामूहिक, कौटुंबिक संडास :
    १९५० च्या सुमारास आम्ही हैद्राबादी गामजी बिल्डिंग नावाच्या एका प्रशस्त बंगल्यात रहात होतो. आठ दहा कुटुंबे ह्यात भाड्याने रहात होती. पण संडास एकच होता. भला मोठा. एका वेळेस दहा जण मावतील असा. रचना अशी होती: दहा चर होते.वर फरशा घातलेल्या होत्या. पायरी दोन माणसांचे पाय माऊ शकतील इतके रुंद होते. संडासाची खोली म्हणजे एक मोठ्ठा चिंचोळा हॉलच होता. एकदा सर्व पुरुष जात तोवर बाहेर बायका जमा होत व मग त्या सर्व एकत्र जात. लहान मुलांना पुरुष अथवा स्त्रियांबरोबर जायची मुभा होती. छान गप्पा मारता येणारा असा त्यावेळचा सामूहिक, कौटुंबिक संडास होता.

    अरुण भालेराव

    ReplyDelete
  10. Sorry! As usual late reader. Ur & frds. writing sounds unresting just you missed the call & waiting for next call which doesn't come till your legs get cramp.Just for your ref. a practical event happened with ur.RajaMama from Vaijapur.At night when he was sitted for Vidhi & in the middle of duration he saw a snake was sitting on the water tap & watching him curiously.He realised & became statue but time & fear didn't allow him.He skillfully opened the latch of door with eye to eye with snake & just jumped out of door with full strength & then put on the Pyjama in that condition.When he came out from the stunning position he took bath & thrown the dress with fear spots forever from mind too.-Satish Mama

    ReplyDelete
  11. आपण या थ्रेड मध्ये मराठीतील काही अ"शी" शब्दरत्ने संकलित करू ज्यात शी येते!

    जसे की,

    मगाशी
    अधाशी
    शीमगा
    शीकार
    शीक्षण
    शीवार
    शीण
    शीवाशीव
    शीतल
    शीत
    शीरा
    शीर
    शीसारी
    शील्प
    शील
    शीला
    इ.इ.

    ReplyDelete
    Replies
    1. Please! शी आणि शि ह्यांत फरक आहे.

      Delete