Thursday, February 25, 2010

किस्से शीचे

१. माझा मामा अरुण भालेराव याने एक मजेशीर किस्सा कळवला तो असा:
ही माझ्या वडिलांची गोष्ट आहे. तेंव्हा ते औरंगाबादी इंटर ला शिकायला होते. पाच सहा मित्र मिळून खोली घेऊन रहात असत. त्या काळी संडास अर्थातच विरळा असत. गटाराने वा कुठे झुडुपा मागे कार्यभाग साधावा लागे. खोलीच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थांचा भला मोठा बंगला होता. मोठी बाग होती. हगणार्‍यांना जणु नंदनवनच.
तर ही मुले सकाळ्ळीच उठून बागेत घाईघाईने हगून येत. ते त्या बंगलेवाल्याला अर्थातच आवडत नसे. एक दिवस तो पाळत ठेवून होता. तीन चार मुलांनी शी करायला तरीही हजेरी लावलीच. आता तो बंगलेवाला ह्यांना रंगे-ढुंगण पकडणार तोच ती तरणी शी-बहाद्दर मुले , टमरेल तिथेच टाकून भिंतीवरून उड्या टाकून पळाली. शेजारी पोलिसांना घेऊन ह्यांच्या खोलीवर हजर. पुरावा काय असे मुलांनी विचारताच त्याने पोलिसाला शी कशी ताजी आहे ते हात लावून पहायला सांगितले. पोलिसाला ते किळसवाणे वाटले. मग त्याने मुलांना नुसताच हग्या दम भरला व पुन्हा हगू नका अशी ताकीद दिली. तर उघड्यावर शी करणे असे धोक्याचे असते व पुरावा कोणी पुरवू शकत नाही ह्याची पळवाट असते असे दोन शी-धडे हयावरून घेता येतात!

२. परवा माझा मित्र प्रसाद बोकील यानं ज़ुळ्या बाळांच्या शीचा एक मजेशीर किस्सा सांगितला तो असा:
ही ज़ुळी बाळं एकाच दुपट्यात. आणि अगदी एकमेकांना अगदी लागून एकाच दुपट्यावर निवांत पडलेली. त्यापैकी एकाने केली शी. आणि ती दुपट्यावर पसरली. आता कळेना शी केली कुणी?! म्हणून दोघांचीपण धुण्यात आली. परत काहीवेळाने दुसर्‍याने केली असणार. तेव्हा कळले नाहीच केली कुणी म्हणून पुन्हा दोघांचीही धुण्यात आली.
यात अशी शक्यता आहे की दोन्ही वेळेस एकानेच शी केली असावी. आणि दुसर्‍याची फुकटच धुतली गेली असावी. यात नेमके काय झाले असावे याचा Probability च्या अभ्यासकांनी/विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा आणि त्यातील तमाम शक्यतांपैकी एक खरोखरच घडली असेल !


6 comments:

  1. मला तर अस वटत की कुणी केलि अणि कुणा चि धुतलि गेलि ह्याचा अत्त विचार करण्यात् कहि अर्थ नहि. फक्त एवढच म्हणीन कि पुन्हा दोहों वर होणार्या अश्या अत्याचाराला अणि आईच्या श्रमाला टळण्या करिता दोघांना वेगवेगळे झोपवावे।
    एक चांगली म्हण शीविषयि सुद्धा लगु होईल -
    ...don't force it and it will come.
    - दीपेश कतिरा

    ReplyDelete
  2. फेक-शी
    एक स्विडिश माणूस एक नवीन साधन विकीत आहे. ते आहे फेक-शी. हे एक डिस्पोजेबल टॉयलेट आहे. एक बायो-डिग्रेडेबल प्लॅस्टिकची त्याने पिशवी केली आहे.लोकांनी त्यात शी करायची,ती बंद करायची नि भिर्रर फेकून द्यायची. त्याला ही कल्पना केनियातल्या झोपडपट्टीतून मिळाली. त्याच्या पिशवीचे नाव आहे”पीपू" किंवा "हेलिकॉप्टर टॉयलेट".ह्या माणसाचे नाव आहे: ऍंडर्स विल्हेल्मसन आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या ३ मार्चच्या अंकात ही बातमी आलेली आहे.
    आपल्याकडे गुजराती जैन साधु, साध्व्या हे अवलंबतात. ते संडासात शी करीत नाहीत. पिशवीत भरून बाहेर टाकतात. आमच्या सोसायटीत एकदा आम्ही ह्याच कारणास्तव त्यांना जागा नाकारली होती.
    -----अरूण भालेराव

    ReplyDelete
  3. फेक-शी
    एक स्विडिश माणूस एक नवीन साधन विकीत आहे. ते आहे फेक-शी. हे एक डिस्पोजेबल टॉयलेट आहे. एक बायो-डिग्रेडेबल प्लॅस्टिकची त्याने पिशवी केली आहे.लोकांनी त्यात शी करायची,ती बंद करायची नि भिर्रर फेकून द्यायची. त्याला ही कल्पना केनियातल्या झोपडपट्टीतून मिळाली. त्याच्या पिशवीचे नाव आहे”पीपू" किंवा "हेलिकॉप्टर टॉयलेट".ह्या माणसाचे नाव आहे: ऍंडर्स विल्हेल्मसन आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या ३ मार्चच्या अंकात ही बातमी आलेली आहे.
    आपल्याकडे गुजराती जैन साधु, साध्व्या हे अवलंबतात. ते संडासात शी करीत नाहीत. पिशवीत भरून बाहेर टाकतात. आमच्या सोसायटीत एकदा आम्ही ह्याच कारणास्तव त्यांना जागा नाकारली होती.
    -----अरूण भालेराव

    ReplyDelete
  4. shee puran chalu dya!!!!

    ReplyDelete
  5. शाळेतील शी-क्षण

    आमच्या शाळेत एक मुलगा होता. नाव सांगत नाही कारण तो आता माझ्याच कंपनीत कामाला लागलाय! तर त्याला चड्डीत शी करायचा प्रॊब्लेम होता...पाचव्या यत्तेत देखील हा बाबा चड्डीतच कार्यक्रम उरकत असे....आणि नेमका दर वेळेस तो माझ्याच पुढच्या बाकावर बसत असे...
    त्याने मी मागे असताना एकंदर ३ वेळा शी केली...

    प्रसंग १:
    यत्ता ५ वी...गणिताचा तास चालू होता आणि अचाक ओळखिचा वाटाव असा घमघमाट सुटू लागला...मी पटकन मागे झुकून पुढे वाकून बघीतले तर या बाबाची चड्डी मागील बाजूस हळू हळू फ़ुगत चालली होती...आतल्या कडक लेंडकाचा भलताच दाब तिच्यावर पडत होता! मी जोरात ओरडलो आणि पळत सुटलो!! शी!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    प्रसंग २:
    तीच यत्ता, तोच वर्ग आणि तेच कारटं...आणि हो...तोच वास पणा जरासा पातळ!! होय! आज पातळ मामला होता!! मी लगेच वाकून बघितले तर बाक हळू हळु जुलाबाने भरत होता! मी परत पळालो!!!
    तोच खणखणीत आवाज!! शी शी शी!!!

    प्रसंग ३:

    आम्ही मैदानात खो खो खेळत होतो...मी पळत पळत आलो आणि या पठ्ठ्याला खो घातला ...पण हा उठायलाच तयार नाही.....
    मला तोच परिचित सुवास आला! आणि मी पुन्हा ओरडत पळत सुटलो! शी शी शी शी!!!

    ReplyDelete