Tuesday, March 15, 2011

विदे-शी

[आमचे स्नेही श्री. आशिष कुलकर्णी यांनी त्यांचा हा मनमोकळा अनुभव आमच्या ब्लॉगावर छापण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार. ते सध्या उल्म, जर्मनी येथे अतिसूक्ष्मतम-पदार्थविज्ञान (Nanomaterial Science) याविषयात उच्चशिक्षण घेत आहेत].

शी : हान ...तर इथे येऊनही मी माझ्या भारतीय पद्धती विसरू शकत नाही याचे अगदी महत्वाचे आणि रोजचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी शी करण्याची पद्धत ..इथे कमोड पद्धती आहे...नुसती पुसा पुशी जी माझ्या भारतीय मनाला आणि शरीराला रुचत नाही... कितीही पुसलं तरी "स्वच्छ नाही झालं वाटतं" ही साशंकता शिवाय नंतर वास येईन की काय ही त्याहून मोठी भीती ...आणि पादलो बिदलो कधी तर "चड्डी थोडी खराब झाली असेल" हे कुतूहल .. असो, माझ्या एकट्यासाठी कोणी भारतीय शैलीचा संडास इथे बांधणार नाही...! त्यामुळी ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे....शिवाय भारतीय पद्धतच म्हणालं तर .. बाहेर जाऊन करावं म्हणलं तर... थंडी इतकी की बाहेर कुठे टमरेल घेऊन जाणे हे म्हणजे शाप दिल्याप्रमाणे ...हाता पायाला जिथे थंडी सोसवत होत नाही तिथे अशी कामे करून नसती रिस्क कशाला घ्या ..जरी घ्यायची म्हणलं आणि थंडीमुळे शी बाहेर येतानाच गोठली तर ?? देवा देवा ! त्यामुळे ह्या महत्वाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मी दीड लिटर ची एक (कोल्ड्रिंक ची) बाटली नळाला येणाऱ्या गरम पाण्याने पुरेपूर भरून घेऊन संडासातच जातो.. आणि कमोड वरच भारतीय पद्धतीने बसतो..आणि आरामात कार्यक्रम उरकतो....कसलाही त्रास नाही... काही वेगळं पण वाटत नाही.. भारतीय फीलच असतो..फक्त तोल जरा सांभाळावा लागतो..! शी ला जाताना ".... फिर भी दिल है हिंदुस्तानी " हे गाणं आठवत..! :) इथल्या कमोड चे डिझाईन पण जरा चांगले म्हणावे म्हणजे त्यातील पाण्यात जरी शी वेगाने प्रवेश करती झाली तरी वापस तेच पाणी चिडून पायावर येत नाही .. जर्मन डिझाईन चे आभार ! मुंबईला कंपनी मध्ये असा प्रयोग एकदा करून पाहिला होता तेव्हा शी च landing कमोडच्या उतारी भागावर मुद्दाम मोठ्या प्रयत्नाने करावं लागायच जेणेकरून खालचे तीर्थ अंगावर उडू नये.. पण घडायचं उलट .. ह्याचा मनोमन राग आला तरी गरज आपलीच म्हणुन पर्याय नसायचा ...त्यामुळे मुंबईतल्या कमोड डिझाईन चा धिक्कार असो !

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. कमोडवर हगण्याची मला का कुणास ठाउक पण उगाचच भिती वाटत असे,,,,एक तर त्यावर भारतीय बैठकीत बसण्यामुळे असेल किंवा त्यात लेंडुक पडताच त्याचा टुपुक् असा आवाज यायच्या आत पाणी उडू नये म्हणून डू वर उचलण्याच्या लबगबीमुळे होणा-या भयकंपामुळे असेल पण कमोड म्हटले की मी नाक मुरडत असे...
    पुढे मला माझ्या एका गुणग्राहक मित्राने कमोडवर बसायची पद्धत कल्पनेने सांगितली...एकदा बसू तरी पाहून असे म्हणून मी जो कमोडासन घालू बसलो तो कायमचाच!!
    (यासाठी कमोड स्वच्छ असणे मात्र अत्यावश्यक आहे बरे! खराब कमोडावर मी मंडुकासनातच बसतो...त्याचे काय आहे, अमेरिकन लोकांना शी करायची आणि नंतर त निस्तरायची सवय, छंद किंवा चाळा जडलेला आहे, त्यामुळे आमच्या कंपनीतील कमोड नजर लागावेत असे स्वच्छा असतात!)अहाहा! काय सूख असते म्हणून सांगू!!!! आपल्या भारतीय बैठकीत ती मजाच नाही!!! कमोडासन एकदा घातलेत की तुमचा आणि खाली घडणा-या हगणदारीचा संबंधच संपतो! उडत असेल तर उडुदेत पाणी बेहद्द!! वर तुम्ही काही करायला मोकळे हो!
    मला संडासात नेऊन पेपर वाचायची सवय त्यामुळेच लागली...
    संडासात बसल्या बसल्या एखादा खरमरीत अग्रलेख वाचून त्यावर होणारे चिंतन हे य जगात अन्यत्र क होऊ शकत नाही असा आमचा दावा आहे!!!
    संडासासारिखे चिंतनस्थळ अवघ्या दुनियेत नाही!!
    पेपर वाचा, मोबाईलवर गेम खेळा, नाक साफ़ करा, नखे खा (उजव्या हाता्ची), पाण्यात खेळत बसा, पाण्याचे समोरील दारावर किंवा भिंतीवर शिंतोडे उडवून त्यांची खाली येण्याची रेस बघत बसा!!
    माझा असा प्रबळ दावा आहे की या जगातील अर्धे शोध हे संडासातच लागलेले आहेत....तो बाथटबातून युरेका युरेका ओरडत उठलेला कुणी शास्त्रज्ञ होता ना, तो खरे तर कमोडवरून उठला होता! पण लोक लज्जेस्तव तो खोटे बोलला असा आमचा दावा आहे!
    बोलेल तो अरेल काय अशी म्हण आहे आणि वास्तव देखील...
    पण असा एकच शब्द आहे तो जगात प्रत्येक माणुस/बाई दिवसभरात एकदा ती म्हणतोच आणि करतो पण "शी" (SHIT)

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. उत्तमे ढमढमे पादे । टाराटुरी च मध्यमम् ॥
    पादानां फ़ुसकुली राणी । तेन घ्राणेंद्र जायते ॥

    ReplyDelete