Tuesday, January 26, 2010

थंडी आणि शी...

थंडीतील शीतून वाफ़ा निघतात. होय, पण त्यासाठी कडाक्याची थंडी हवी आणि आपल्या झालेल्या शीचे निरीक्षण करण्याची क्षमता. बालमनोविज्ञानानुसार (आमच्या ब्लॉगवरील एक लेख पूर्णपणे शी आणि बालमनोविज्ञान यावर येणार आहे.) बालवयात मुलांना आपल्या शीचे भयंकर अप्रूप असते. शी झाल्यावर तिला भर्रकन भांड्यात पाठवून देणे त्यांना पसंत नसते. आपण काहीतरी मोठे केले आहे असेच त्यांना वाटत असते. शहाण्या आयांनी याची दखल घ्यायला हवी. असो. तर बाहेर कडाक्याची थंडी असेल म्हणजे महाराष्ट्रातील थंडी नव्हे पंजाब, हरियाणा, अशा उत्तरेतील भागातील थंडी असेल तर हमखास आपल्या शी-शूतून वाफ़ा निघतात. तेव्हा आपल्याला काही झालेले नसते. हा सगळा बाहेरच्या वातावरणातील तापामानाचा खेळ असतो. जसे थंडीत आपल्या तोंडातून वाफ़ा निघतात तशाच मागून!

या थंडीत शी धुणे मोठे अवघड होऊन बसते. गरम पाणी असेल तर स्वर्गसुख आणि थंडच असेल तर नरकयातना! बरं आपण पडलो भारतीय त्यामुळे टिशू-कागदाने आपणही पुसून समाधानी होत नाही. शिवाय, त्याने पूर्ण पुसली गेली आहे याची शाश्वतीही नसते. एकूणच थंडीत हात धुणे आणि शी धुणे यासठी गरम पाणी नसले तर याहून मोठी शिक्षा कोणतीच नसते.

दुसरे म्हणजे थंडीतल्या शीत शौचलयांनीही थोडी साथ दिली पाहिजे. खिडकीतून किंवा दाराच्या खालच्या फटीतून येणार्‍या गार वार्‍याच्या झुळका इतक्या बोचर्‍या होतात की त्यामुळे एरव्ही बाहेर सर्वतोपरी झाकलेलं आणि उबेचा साठाच असलेलं आपलं ढुंगण अगदी शहारून ज़ातं आणि गार पडतं. त्यात भरीसभर म्हणजे वरून जीर्ण फ़्लशच्या गळक्या पाईपमधून प्रचंड गार पाण्याच्या टपोर्‍या थेंबांचा अभिषेक होत असेल तर विचारायलाच नको. भलेही अंगावर पडत नसतील ते थेंब; ते ज़मिनीवर पडणार मग त्या टपोर्‍या थेंबाच्या ठिकर्‍या उडणार आणि असे त्याचे बारीक तुषार आपल्या "कधी-एकदाची -शी- संपवतो" असा विचार करणार्‍या नितंबांचे दर ८-१० सेकंदांच्या फरकाने चुंबन घेणार!

थंडीच्या काळात रल्वेत असाल तरी तेच! ३ ए सी असो किंवा स्लीपर संडास तसे सारखेच. रेल्वेच्या संडासातील भांड्याच्या खालच्या भोकातून येणारं गार वारं इतकं भयानक असतं की ज़र आपण संडासात नसतो तर चड्डीतच झाली असती!

4 comments:

  1. you forgot one important point, chinya!

    the seat of commode is horribly cold during winters! 'she' doesn't like it! ;)

    ReplyDelete
  2. एकदा एक डुक्कर आणि डुकराचे बाबा शी खात असतात...
    ताजी ताजी गरम गरम शी! वाफ़ाळलेली.....
    पिलू डुक्कर न रहावून बापाल विचारते, "बाबा, बाबा, आपण माणसाची शी खातो तसे माणुस आपली शी खातो का हो?"
    बाबा चिडतात आणि त्याच्यावर डुरकतात! "डुक्या! जेवताना असं घाण बोलू नये!"
    हा हा हा हा !!!!!!!!

    ReplyDelete
  3. एकदा याच डुक्याला जोराची भूक लागते...ते आईच्या मागे लाग की आई मला शी...मला शी.....
    आई म्हणते ,"बाळ, जरा थांब...अत्ताच कूकर लागलाय आणि २ शिट्ट्या झाल्या की देईन तुला गरम गरम ताजी ताजी शी!!!"

    ReplyDelete
  4. यत्ता ५ वी...गणिताचा तास चालू होता आणि अचाक ओळखिचा वाटाव असा घमघमाट सुटू लागला...मी पटकन मागे झुकून पुढे वाकून बघीतले तर या बाबाची चड्डी मागील बाजूस हळू हळू फ़ुगत चालली होती...आतल्या कडक लेंडकाचा भलताच दाब तिच्यावर पडत होता! मी जोरात ओरडलो आणि पळत सुटलो!! शी!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete